













Assam , Meghalaya & Arunachal
3 सिस्टर्स : आसाम – अरुणाचल – मेघालय
10 रात्री 11 दिवस
सहल खर्च – 79,000 + 5% जी.एस.टी प्रति व्यक्ती
सहलीची तारीख: 13 ते 23 नोव्हेंबर 2025
सहलीतील मुक्काम:
काझीरंगा – 2 रात्री | दिरांग – 1 रात्र | तवांग – 2 रात्री | तेजपूर – 1 रात्र
शिलॉग – 3 रात्री | गुवाहाटी – 1 रात्र
सहलीची रूपरेषा:
13 नोव्हेंबर: पुणे ते गुवाहाटी विमानप्रवास
गुवाहाटी विमानतळावर आगमन आणि काझीरंगा कडे प्रस्थान, काझीरंगा नॅशनल पार्क हे जागतिक वारसा स्थळ व ग्रेट इंडियन एक शिंग असलेल्या गेंडासाठी प्रसिद्ध आहे, वाटेत नाष्टा करून बालाजी टेम्पल, मृत्युंजय टेम्पल पाहून हॉटेल चेक इन.
14 नोव्हेंबर: काझीरंगा सफारी, रात्रीचा मुक्काम काझीरंगा येथे
सकाळी लवकर काझीरंगा नॅशनल पार्क येथे हत्ती वरून सफारीचा आनंद घेणे (स्वखर्चाने), त्यानंतर सकाळी नाष्टा करून आर्किड पार्क आणि जीप मधून काझीरंगा सफारी करून हॉटेलवर परत, सायंकाळी हॉटेलवर कल्चरल शो (बिहू नृत्य) चा आनंद. रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम.
15 नोव्हेंबर: काझीरंगा ते दिरांग प्रवास
सकाळी नाष्ट्यानंतर हॉटेल चेक आउट करून दिरांग कडे प्रस्थान - सायंकाळी दिरांग आगमन हॉटेल चेक इन, रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम.
16 नोव्हेंबर: दिरांग ते तवांग प्रवास
सकाळी नाष्ट्यानंतर हॉटेल चेक आउट करून तवांग कडे प्रस्थान, वाटेत जाताना दिरांग मॉनेस्ट्री पाहणे, त्यानंतर सेला पास पाहणे, सायंकाळी तवांग येथे आगमन व हॉटेल चेक इन, रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम.
17 नोव्हेंबर: तवांग ते माधुरी लेक व बुमला पास, रात्रीचा मुक्काम तवांग येथे
सकाळी नाष्टा करून माधुरी तलाव (सांगेत्सर लेक) कडे प्रयाण, माधुरी तलाव पाहणे, त्यानंतर बुमला पास कडे प्रयाण बुमला पास त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखला जातो. 1962 च्या भारत-चीन युद्धातील युद्धस्थळांपैकी एक असल्याने याला ऐतिहासिक महत्त्व आहे. भारत-चीन वास्तविक नियंत्रण रेषा या पास पासून काही अंतरावर आहे. सायंकाळी तवांग येथे आगमन व रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम.
18 नोव्हेंबर: तवांग ते तेजपूर प्रवास
सकाळी नाष्ट्यानंतर हॉटेल चेक आउट करून तेजपूर कडे प्रस्थान, वाटेत तवांग मॉनेस्ट्री, नुरानंग फॉल्स, जसवंत गड, ई. पाहून सायंकाळी तेजपूर येथे आगमन व हॉटेल चेक इन, रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम.
19 नोव्हेंबर: तेजपूर ते शिलॉंग प्रवास
सकाळी नाष्ट्यानंतर हॉटेल चेक आउट करून शिलॉंग कडे प्रस्थान, वाटेत उमियम तलाव (बडापाणी) पाहणे - बोटिंग व वॉटर स्पोर्ट्स (स्वखर्चाने), दुपारी शिलॉंग आगमन आणि हॉटेल चेक इन. दुपार नंतर शिलॉंग लोकल स्थळदर्शन. रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम.
20 नोव्हेंबर: शिलॉंग - डावकी रिव्हर - मौलिनॉन्ग व्हिलेज - रूट ब्रिज स्थळदर्शन
सकाळी नाष्टा करून बांगलादेश बॉर्डर जवळ - डावकी रिव्हर बोट राईड - तिच्या अतुलनीय नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ती जगातील सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक आहे. नंतर मौलिनॉन्ग व्हिलेज हे छोटेसे गाव स्वच्छतेसाठी ओळखले जाते ते आपण पाहतो. दुपारचे जेवण करून रूट ब्रिज पाहणे, सायंकाळी शिलॉंग हॉटेलवर आगमन. रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम.
21 नोव्हेंबर: शिलॉंग - चेरापुंजी स्थळदर्शन - शिलॉंग
सकाळी नाष्टा करून चेरापुंजी कडे प्रस्थान, चेरापुंजी येथे आगमन व स्थळदर्शन - मवस्मयी केव्ह्स, सेव्हन सिस्टर धबधबा, नोहाकालीकाई धबधबा ई. पाहणे. सायंकाळी शिलॉंग हॉटेलवर आगमन. रात्रीचे जेवण करून हॉटेल मुक्काम.
22 नोव्हेंबर: शिलॉंग ते गुवाहाटी प्रवास
सकाळी नाष्ट्यानंतर हॉटेल चेक आउट करून गुवाहाटी कडे प्रस्थान, वाटेत एलिफन्ट धबधबा पाहून दुपारचे जेवण. दुपारी जेवणानंतर ब्रम्हपुत्रा नदीवर १ तासाची क्रूज सफर करून गुवाहाटी हॉटेल चेक इन.
23 नोव्हेंबर: गुवाहाटी लोकल स्थळदर्शन, गुवाहाटी ते पुणे विमानप्रवास
पहाटे श्री कामाख्या देवी मंदिर दर्शन करून परत हॉटेलवर नाष्टा. नाष्ट्यानंतर हॉटेल चेक आउट करून फॅन्सी बाजार शॉपिंग साठी मोकळा वेळ. रात्रीचे जेवण करून गुवाहाटी विमानतळावर आगमन, विमानाने पुण्याकडे प्रस्थान. पुणे आगमन व सहल समाप्त.
सहल खर्चातील समाविष्ट मुद्दे -
पुणे - गुवाहाटी - पुणे इकॉनॉमी क्लास विमान प्रवास भाडे, तसेच विमानतळाशी निगडित कर
उत्तम प्रकारचे 3 स्टार एसी / नॉन एसी डिलक्स हॉटेल (डबल शेअरिंग)
जेवणाची व्यवस्था पूर्णपणे शाकाहारी / मांसाहारी (फक्त रात्री) असेल.
सकाळी चहा-नाष्टा, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण
प्रत्येकी दररोज 2 मिनरल वॉटर बॉटल (1 ली)
टूरमधील प्रेक्षणीय स्थळांचे प्रवेश शुल्क
ब्रम्हपुत्रा नदीवर 1 तासाची क्रूज राईड
डावकी रिव्हर बोट राईड
कल्चरल शो (बिहू नृत्य)
काझीरंगा येथील जीप सफारी
फिरण्यासाठी वातानुकूलित (AC Urbania) बसची व्यवस्था
ग्रुप टूर सोबत अनुभवी मराठी टूर गाईड
ट्रॅव्हल कॅप / टॅग्स / ट्रॅव्हल इंशुरन्स
सहल खर्चातील समाविष्ट नसलेले मुद्दे -
5% जी.एस.टी.
काझीरंगा येथील हत्ती सफारी
मंदिरामध्ये पूजा व इतर विधींसाठी येणारा खर्च
टीप, लाँड्री, फोन बिल, व्यक्तिगत खान पान खर्च
विमान प्रवासातील जेवण, बोटिंग, घरापासून एअरपोर्ट पर्यंतचा खर्च
टीप: सर्व हक्क LO Holidays द्वारे राखीव आहेत. टूर प्रवासापूर्वी किंवा प्रवासादरम्यान उद्भवलेल्या कोणत्याही परिस्थितीमुळे टूरची रूपरेषा आणि प्रवासाचा कार्यक्रम बदलू शकतो.
· टूरमध्ये विमान, बस अथवा अन्य साधनांनी प्रवास करताना किंवा पर्यटनादरम्यान अपघात / आपत्ती / संकट उद्भवल्यास व त्यामुळे शारीरिक / जीवित / वित्त हानी झाल्यास आपणास योग्य ते सहकार्य केले जाईल, परंतु कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त खर्चाची जबाबदारी कंपनीकडे राहणार नाही
· टूर दरम्यान नैसर्गिक आपत्ती, खराब हवामान, राजकीय घडामोडी इ. मुळे आपल्या ठरलेल्या कार्यक्रमात वेळेवर बदल होऊ शकतो व त्याचे सर्व अधिकार कंपनी (IHSPL) कडे राखीव असतील. तसेच टूर दरम्यान नैसर्गिक आपत्ती, हवामानातील बदल व इतर काही तांत्रीक बाबीमुळे विमान / बस वेळापत्रकात बदल अथवा रद्द झाल्यास आपले हॉटेल वास्तव्य, विमान, रेल्वे अथवा बस खर्च वाढू शकतो. या वाढलेल्या अतिरिक्त खर्चाची जबाबदारी पर्यटकाची असेल
Cancellation Policy:
· From 30 Days to 15 day prior to arrival date : 50.00 % of the entire package
· From 14 Days to 1 day prior to arrival date : 100.00 % of the entire package